(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ आयोजनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा | मराठी १ नंबर बातम्या

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ आयोजनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा

मुंबई, ( २ फेब्रुवारी ) : मुंबईत होणाऱ्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या पूर्व तयारीचा आढावा आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. दि. १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान एमएमआरडीएच्या मैदानावर ही भव्य जागतिक गुंतवणूकदारांची शिखर परिषद होणार आहे. या शिखर परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत अनेक परिसंवाद तसेच सामंजस्य करार होणार आहेत. या परिषदेला जगभरातील उद्योजक, व्यापारी शिष्टमंडळे उपस्थित राहणार आहेत.

प्रारंभी मॅग्नेटिक महाराष्ट्र तयारी बाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के.जैन, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव
विजय कुमार, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया,
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, आदी यावेळी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget