मुंबई ( १० फेब्रुवारी ) : भायखळा (पूर्व) रेल्वे स्टेशन जवळ असणा-या महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत शुक्रवार, दिनांक ०९ फेब्रुवारी २०१८ पासून महापालिकेचे तीन दिवसीय वार्षिक उद्यान प्रदर्शन सुरु झाले आहे. गेल्या दोन दिवसात सुमारे ७५ नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नाट्य-चित्रपट संबंधी क्षेत्रातील कलावंतांनी देखील या प्रदर्शनाला भेट देऊन येथील कलाकृतींचे कौतुक केले आहे. यामध्ये प्रामुख्याने ऋषी कपूर, फरहान अख्तर, रमेश भाटकर, मनीष पॉल, नीता शेट्टी, कमलाकर सातपुते, अन्नू कपूर, वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे, सुनील पाल इत्यादींचा समावेश होता.
पाना-फुलांपासून तयार करण्यात आलेले डॉल्फिन, जलपरी, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, ऍनाकोंडा, इत्यादींच्या प्रतिकृतींसह कृत्रिम नदी आणि फुलांनी भरलेला काश्मिरी शिकारा यावर्षीच्या उद्यान प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरला आहे. गेल्या २ दिवसात ७५ हजार मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. रविवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असणार असून हे प्रदर्शन सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे दरवर्षी साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात उद्यान विषयक प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनात गेल्यावर्षीपासून एक विषय घेऊन त्यावर आधारित पुष्परचना, वृक्षरचना विशेषत्वाने प्रदर्शित करण्यात येत आहेत. या वर्षी जलप्रदुषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने कृत्रिम नदी तयार करण्यात आली असून पानाफुलांपासून तयार करण्यात आलेली लहानग्यांची आवडती जलपरी आणि शिकारा (काश्मिरी पद्धतीची नाव) देखील या नदीमध्ये आहे. यासोबतच डॉल्फिन, स्टारफिश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, ऍनाकोंडा यासारख्या जलचरांच्या वा इतर प्रकारातील प्राण्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात आहेत.
'महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम १९७५' मधील तरतूदींनुसार दरवर्षी वृक्ष प्राधिकरण व महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणा-या फुले, फळे व भाज्या याविषयीच्या वार्षिक प्रदर्शनाचे हे २३ वे वर्ष आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कुंड्यांमधील शोभिवंत झाडे, पुष्परचना, फुलझाडे, लॅण्डस्केप आर्ट आदी विविध विषयांवरील स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांमध्ये शासकीय, निमशासकीय यासह खाजगी क्षेत्रातील संस्था / कंपन्या देखील सहभागी होऊन आपली पर्यावरणपूरक कला सादर केल्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व रचना देखील या प्रदर्शनात आहेत.
दि. ९ फेब्रुवारी २०१८ पासून सुरु झालेल्या या प्रदर्शनात विविध प्रजातींची १० हजारांपेक्षा अधिक झाडे आहेत. यामध्ये कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय, वेली यांचा समावेश आहे. तसेच विविध प्रकारची तुळशीची झाडे, बेल, हळद, कापूर, आवळा, बेहडा, हिरडा, चंदन बडीशेप, अश्वगंधा, बदाम, काजू यासह हात लावताच पाने मिटून घेणार लाजाळूचे झाड; यासारखी अनेक औषधी व सुगंधी झाडे देखील या प्रदर्शनात आहेत. यासोबतच जिरे, मिरे, विलायची, लवंग, जायफळ, धणे यासारख्या मसाल्यात टाकावयाच्या पदार्थांची झाडे, जी एरवी आपल्याला केरळ मध्येच बघायला मिळाली असती, ती देखील या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईतच बघायला मिळत आहेत.
यावर्षीच्या प्रदर्शनात परदेशी भाज्यांचे एक स्वतंत्र दालन देखील आहे. त्यामध्ये झुकिनी, टुर्निप, नवलकोल, ब्रोकिली, रेड कॅबेज आणि बर्गर मध्ये वापरण्यात येणा-या लेट्यूस सारख्या भाज्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शोभेच्या झाडांसाठीही एक स्वतंत्र विभाग या प्रदर्शनात आहे. यामध्ये मयूरपंखी, ब्रह्मकमळ, ख्रिसमस ट्री, निवडुंग, लिली, जरबेरा यासारखी अनेक शोभेची झाडे आहेत. झाडांमध्ये अत्यंत महागडे समजले जाणा-या 'बोनसाय' अर्थात बटुवृक्षाचीही अनेक रुपे या प्रदर्शनात आपल्याला बघायला उपलब्ध आहेत.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या विक्री विभागात ४० दालने उभारण्यात आली आहेत. या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकाम विषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी विक्रीस उपलब्ध आहेत, अशीही माहिती उद्यान अधीक्षक परदेशी यांनी दिली आहे.
रविवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०१८ हा या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून सकाळी ८ ते सायंकाळी ८ या दरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा