(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ४० वर्षांनी १३० डॉक्टर पुन्हा भेटले एकमेकांना | मराठी १ नंबर बातम्या

४० वर्षांनी १३० डॉक्टर पुन्हा भेटले एकमेकांना

मुंबई ( ६ फेब्रुवारी ) : ''आज खोल के अपने यादों के गेट, मिल बैठे एक बार फिर ऑगस्ट सेव्हन्टी ऐट'', हे दॄश्य केईएम रुग्णालयात शनिवारी पाहायला मिळाले.

शेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयात वैद्यकीय स्नातक होण्यासाठी ऑगस्ट १९७८ मध्ये प्रवेश घेऊन पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण प्राप्त करून भारतात आणि जगभरामध्ये विशेष प्राविण्यासह वैद्यकीय व्यवसायात सक्रीय असलेल्या वैद्यकीय व्यायसायिकांचे शनिवारी आणि रविवारी केईएम रुग्णालय आणि पवई येथील रामाडा हॉटेल येथे स्नेह संमेलन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.

भेठीगाठीत सर्वांनी आपल्या वैद्यकीय महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाशी संबधित एमएलटी व्याख्यान कक्ष, उपहारगृह, मेस, विविध खाती, क्रीडांगण, वस्तीगृह यांना भेट देऊन पाहाणी केली.

सदर कार्यक्रमासाठी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अविनाश सुपे यांचे शुभाशिर्वाद प्राप्त झाले, असे डॉक्टरांनी म्हटले. त्यांनी स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या. त्यांच्या अनुपस्थितीत डॉ. गणेश शिंदे यांनी म्हणजे १९७८ च्या बॅचमधील विद्यार्थी आणि सध्याचे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता यांनी आपल्या विशेष उपस्थितीमध्ये सर्वांचे स्वागत केले.
सदर कार्यक्रमास शंभर पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी देशविदेशातून हजेरी दर्शवुन प्रंचड प्रतिसाद दिला. यावेळी ते आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले.

कार्यक्रमासाठी केईएमच्या आविष्कार चमुचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्यातर्फे सर्वांना लोगो सहित टी शर्ट, स्मृतिचिन्ह, लोगोसहित कप, ग्रुप फोटो सहित फ्रेम अशा भेटवस्तूंची बॅग देऊन त्यांनी सर्वांचे स्वागत केले.

केईएम एमएलटीमध्ये आविष्कार चमुतर्फे स्वागत झाल्यानंतर महाविद्यालयातील प्रवेशापासून ते आजगायत निधन झालेल्या सहकार्यांना यावेळी श्रद्धांजलि वाहण्यात आली.

त्यानंतर सभागृहात डॉ. जनक दोशी, डॉ. मनोज चंदीरामानी, डॉ. शैलेंद्र सिंग, डॉ. राजू नगरकड्डी, डॉ. राज केदार, डॉ. अब्बासी, डॉ. चंद्रहास देशमुख आणि इतरांनी संयोजनाची तसेच आयोजक म्हणून विशेष कामगिरी मेहनत करून पार पाडल्याने त्यांची प्रशंसा करण्यात आली. आविष्कारतर्फे प्रेझेंटेशनद्वारे आविष्कारचा प्रवास दाखविण्यात आला. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाल्यावर ग्रुप फोटो काढले गेले.

त्यानंतर रामडा हॉटेलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. माजी संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शांताराम नाईक आणि बॅचचे विद्यार्थी यांनी विशेष केकची व्यवस्था केली. तो केक आयोजकांतर्फे कापून सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

डॉ. राज केदार यांच्या गतस्मृतींना उजाळा देणारा ''पैचान कौन ? ", हे प्रेझेंटेशन हा कार्यक्रमाचा परमोच्च बिंदु होता. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेकांच्या नात्यांची धम्माल मस्तीला उजाळा देत जल्लोषासह सर्वजण एकमेकांसह सेल्फी, ग्रुप फोटो काढत जुन्या आठवणीत रमुन गेले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget