(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विश्वविजेत्या युवा क्रिकेटपटुंचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन | मराठी १ नंबर बातम्या

विश्वविजेत्या युवा क्रिकेटपटुंचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, ( ३ फेब्रुवारी ) : एकोणीस वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट विश्वकरंडकावर आपले नाव कोरणाऱ्या भारताच्या युवा संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.

बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय युवा संघाने चौथ्यांदा विश्वकरंडक पटकाविला आहे. त्याचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या विजयोत्सवाचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले
आहे. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट संघ भावनेने खेळ करताना भारतीय खेळाडूंनी दाखविलेले सातत्य कौतुकास्पद असून भारतीय क्रिकेटसाठी ते आशादायी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या संघाचे प्रशिक्षक राहूल द्रविड यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget