(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); परिचर्या संचालनालय स्थापन करण्याबाबतची कार्यवाही सुरू - डॉ. दीपक सावंत | मराठी १ नंबर बातम्या

परिचर्या संचालनालय स्थापन करण्याबाबतची कार्यवाही सुरू - डॉ. दीपक सावंत

मुंबई ( १६ मार्च २०१८ ) : केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातही स्वतंत्र परिचर्या संचालनालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याविषयीची कार्यवाही आरोग्य संचालनालय स्तरावर सुरू आहे. परिचर्या संचालनालयाल पुढील सहा महिन्यात होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधीद्वारे राज्यातील आरोग्य परिचारिकांच्या विविध समस्यांविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना डॅा. सावंत बोलत होते. आरोग्य संचालनालयाअंतर्गत परिचारिका संवर्गातील सर्व पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम शासन स्तरावर विचाराधीन आहे. तसेच परिचारिकांच्या धुलाई, आहार, गणवेश व जोखीम भत्त्यात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर तयार करण्यात येत आहे. तसेच जीएनएमचे विद्यावेतन वाढवण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन आहे. येत्या तीन महिन्यात यावर निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. सावंत म्हणाले.

भारतीय परिचर्या परिषदेच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जीएनएम अभ्यासक्रमाचे उन्नतीकरण २०२२ पर्यंत करणे अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत संचालनालयाच्या नियंत्रणाखाली जीएनएम प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे उन्नतीकरण करून त्याठिकाणी बेसिक बीएसस्सी (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांमध्ये कार्यवाही सुरू करण्यात आलेली असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य नागो गाणार, हेमंत टकले यांनी भाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget