(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे | मराठी १ नंबर बातम्या

राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे

· 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांची कलचाचणी

· महाकरियर मित्र पोर्टलवर अहवाल उपलब्ध

मुंबई ( १२ मे २०१८ ) : दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कलचाचणी 2018 चा अहवाल आज जाहिर करण्यात आला असून 2018 मध्ये 17 लाख 36हजार 104 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली आहे. यावर्षी 2018 मध्ये वाणिज्य क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल हा सर्वाधिक दिसून आला आहे. या कलचाचणीचा सविस्तरअहवाल www.mahacareermitra.in वर उपलब्ध असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणी 2018 चा अहवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज जाहिर केला. त्यानंतर श्री. तावडे यांनीसांगितले की, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचायला मदत करणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याचा दृष्टिकोनमहाराष्ट्र शासनाचा आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये कलचाचणी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच देण्याचा शासनाचा मनोदय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

2018 या वर्षामध्ये 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली. ही कलचाचणी विद्यार्थ्यांचे 7 प्रमुख क्षेत्रातील कलचे परीक्षण करते. 2017 च्याकलचाचणी अहवालानुसार विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल हा ललितकला म्हणजेच (fine arts) या क्षेत्रात सर्वाधिक दिसून आला होता. तर यावर्षी 2018 मध्ये वाणिज्यक्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक दिसून येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्दिष्टाने 2016 पासून राज्य शासनाच्या 10 वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्वविद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचा उपक्रम सुरू करण्यात आला. ज्याअंतर्गत या मुलांचा कल ओळखू शकणारी कल चाचणी घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेला बसलेल्यासर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

कलचाचणी हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांचा संयुक्त प्रकल्प असून श्यामची आई फाऊंडेशन हेसामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) च्या सहाय्याने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सहकार्य करीत आहे. कलचाचणी प्रत्येक विद्यार्थ्याला करिअर निवडकरण्यास मदत करते.

याशिवाय विद्यार्थ्यांना कल अहवालाबाबत शालेय स्तरावर अधिक मार्गदर्शन मिळावे या हेतूने महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने 12 हजार शासकीय व शासनअनुदानित माध्यमिक विद्यालयांमधील एक मुख्याध्यापक व 2 शिक्षक यांना ‘अविरत’ या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित केले आहे. याद्वारे 41,607शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले आहे. पुढील मार्गदर्शनासाठी विद्यार्थी पोर्टलवर दिलेल्या त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था (DIECPD)केंद्राशी संपर्क साध्यण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

www.mahacareermitra.in वरून मिळवा अहवाल
विद्यार्थी त्यांच्या एसएससी बोर्ड क्रमांकाच्या आधारे त्यांचा कलचाचणी अहवाल ऑनलाईन प्राप्त करू शकतात. त्यासाठीत्यांनी www.mahacareermitra.in या पोर्टलवर जाऊन मुखपृष्ठावर त्यांनी आपला हा क्रमांक प्रविष्ठ केल्यानंतरत्यांना त्यांचा कलचाचणी चा अहवाल मिळू शकेल. हा अहवाल विद्यार्थी डाऊनलोड करू शकतात. याच सोबत त्यांचाकल ज्या क्षेत्रात आला आहे त्या क्षेत्राविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ ते पाहू शकतात. तसेच त्यांचा आवड क्षेत्रानुसारत्यांच्या जिल्ह्यातील अभ्यासक्रमांचा शोध ही त्यांना या पोर्टलद्वारे घेता येऊ शकतो. पोर्टलवर 70 हजारहून अधिकशासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली आहे. पालकांनी या शास्त्रशुद्ध कलचाचणीच्या आधारेच विद्यार्थ्यांचाभविष्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
क्षेत्रनिहाय राज्यस्तरीय कल विश्लेषण
युनिफॉर्मडसेवा
कृषी
कला
ललित कला
आरोग्य विज्ञान
वाणिज्य
तांत्रिक
15%
13%
11%
18%
12%
21%
10%

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget