(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : विद्युत निरीक्षणालयात आता मुख्य विद्युत निरीक्षकाचे पद | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रिमंडळ बैठक : विद्युत निरीक्षणालयात आता मुख्य विद्युत निरीक्षकाचे पद

मुंबई ( २९ मे २०१८ ) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्युत निरीक्षणालय ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली आणल्यानंतर याचे नियंत्रण करण्यासाठी मुख्य विद्युत निरीक्षक पद मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली.

विद्युत निरीक्षणालय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना त्याचे सर्व प्रशासकीय कामकाज मुख्य अभियंता (विद्युत) यांच्याकडून हाताळण्यात येत होते. मात्र विद्युत अधिनियम 2003 व त्या अनुषंगाने बनविण्यात आलेले नियम व विनियम सक्षमपणे राबविण्यासाठी 2015 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्युत निरीक्षणालय ऊर्जा विभागाच्या अस्थापनेखाली आणल्यानंतर या निरीक्षणालयासाठी मुख्य विद्युत निरीक्षक पद निर्माण करणे आवश्यक बनले होते.

मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली विद्युत निरीक्षणालय शाखेतील अधिक्षक अभियंता, विद्युत निरीक्षक, सहाय्यक विद्युत निरीक्षक, सहाय्यक अभियंता श्रेणी-२, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता ही तांत्रिक व उपसंचालक (लेखा), विद्युत निरीक्षक व इतर अतांत्रिक अशी एकूण 1046 पदे कार्यरत आहे. या अस्थापनेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच महसूल वसुलीचे काम आणखी प्रभावी करण्यासाठी मुख्य विद्युत निरीक्षक हे पद निर्माण करण्यात आले असून या पदासाठी 37400-67000 ही वेतनश्रेणी असून 10000 हा ग्रेड पे आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget