(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज | मराठी १ नंबर बातम्या

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

पालघर ( २६ मे २०१८ ) : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असुन 2097 मतदान केंद्रांवर 28 मे रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली. या पोटवडणुकी करिता 12 हजार 894 कर्मचारी तसेच चार हजार 219 सुरक्षा कर्मचारी कार्यरत राहणार आहे.

२०९७ केंद्रांपैकी 14 केंद्रांना क्रिटिकल असे नमूद करण्यात आले असून यामध्ये या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार असल्याचेही डॉ नारनवरे यांनी सांगितले.पालघर लोकसभा क्षेत्रातिल डहाणू विधानसभा क्षेत्रात 327, विक्रमगड मध्ये 328, पालघर मध्ये 318, बोईसर मध्ये 338, नालासोपारा मध्ये 449 तर वसई विधान सभा क्षेत्रात 327 मतदान केंद्र आहेत. या पैकी डहाणू मधील पतीलपाडा(63), बोईसर मधील बोईसर(34), धोंडीपूजा (85), खैरपडा (294) तसेच वळीव मधील तीन केंद्र, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण 14 केंद्र क्रिटिकल घोषित करण्यात आली आहेत.मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिकरिक्त पोलीस अधीक्षक, 9 उप विभागीय पोलीस अधिकारी, 18 पोलीस निरीक्षक, 182 पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार 602 पोलीस शिपाई, 495 नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार 117 होमगार्ड व 46 नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक याना तैनात करण्यात आले आहेत.

मतदानासाठी दोन हजार 737 मतदान केंद्र अध्यक्ष, सात हजार 737 मतदान अधिकारी व दोन हजार 308 शिपाई यांचा फौज फाटा कार्यरत राहणार आहे.

सर्व मतदारांना 2097 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत मतदार चिठ्ठयांचे ( Voter Slip) वाटप करण्यात येत आहे. मतदान झाल्यानंतर EVM व VVPAT मशिन संबधित विधानसभा मतदार संघ मुख्यालयाच्या स्टॉग रुममध्ये जमा करण्यात येतील व त्यांनतर कडक पोलिस बंदोबस्तामध्ये सदर मशिन पालघर येथील सुर्या कॉलनी मधील जिल्हा स्ट्रॅाग रुममध्ये जमा करण्यात येतील.

31 मे रोजी पालघर येथे होणाऱ्या मतमोजणी ला सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी 14 असे एकूण 84 मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबल वर सुपरवायझर, सहाय्यक व मायक्रो ऑब्झरवर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे 600 अधिकारी - कर्मचारी कार्यराय रहातील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ नारनवरे यांनी दिली.

मतदान सोमवार दि २८ मे रोजी दिवशी सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यत तर मतमोजीणी दि. 31/58/2018 सकाळी 8.00 वाजता सुरु होणार आहे. मतदान प्रक्रीया शांतपणे व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व इतर सर्व यंत्रणा सुसज्ज असून सर्व मतदारांनी मोठया संख्येने उपस्थित राहून मतदान करावे असणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ नारनवरे यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget