(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील 49 मतदान केंद्रांवर आज फेर मतदान | मराठी १ नंबर बातम्या

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील 49 मतदान केंद्रांवर आज फेर मतदान

मुंबई ( ३० मे २०१८ ) : काल झालेल्या 11-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्रे (EVM)आणि VVPAT यंत्रे तांत्रिक दोषामुळे बंद पडल्याने मतदान प्रक्रियेमध्ये खंड पडला होता. या लोकसभा मतदार संघाच्या 5 विधानसभा मतदार संघातील 49 मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार उद्या दि.30 मे 2018 रोजी फेरमतदान घेण्यात येणार आहे.

63-अर्जुनी मोरगांव (अ.जा.) या विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्रांवर सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर उर्वरित मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या अनामिका बोटावर (RING FINGER) शाई लावण्यात येणार आहे.

फेरमतदान घेण्यात येणारी मतदान केंद्रे :

61-भंडारा (अ.जा.) विधानसभा मतदार संघ - मतदान केंद्र क्र. 302,318,320,335,362,403,405,374,314,317,322,428,429 आणि 363.

62- साकोली- मतदान केंद्र क्र. 306, 316, 292 आणि 287.

63-अर्जुनी मोरगांव (अ.जा.) - मतदान केंद्र क्र. 108 आणि 159.

64- तिरोडा - मतदान केंद्र क्र. 45, 97, 102, 108, 205, 215, 38, 52.

65- गोंदिया - मतदान केंद्र क्र. 50,78, 94, 115, 116,117,123,169, 176ए, 194, 200, 206, 218,225, 233, 240,250, 253, 271, 276 आणि 303ए.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget