(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : पालिकांमधील अन्न निरीक्षकांना ‘अन्न व औषध प्रशासना’मध्ये सामावणार | मराठी १ नंबर बातम्या

मंत्रिमंडळ बैठक : पालिकांमधील अन्न निरीक्षकांना ‘अन्न व औषध प्रशासना’मध्ये सामावणार

मुंबई ( २९ मे २०१८ ) : अन्न भेसळ व सुरक्षेसाठी अस्तित्वात असलेल्या अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम-2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरी स्वराज्य संस्थेकडे कार्यरत असलेल्या अन्न निरीक्षकांना अन्न व औषध प्रशासनामध्ये (एफडीए) अन्नसुरक्षा अधिकारी (गट-ब) या संवर्गामध्ये सामावून घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान घेण्यात आला.

अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम-2006 हा कायदा ऑगस्ट-2011 पासून देशभरात लागू करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमाची एकछत्री अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आयुक्त, अन्न व औषध प्रशासन तथा अन्न सुरक्षा आयुक्त यांनी दिनांक 1 ऑगस्ट 2011 रोजी अधिसूचना काढून अन्न व औषध प्रशासनाच्या आस्थापनेवरील तसेच नागरी स्वराज्य संस्थांच्या आस्थापनेवरील सर्व अन्न निरीक्षकांना अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून विशिष्ट कार्यक्षेत्रांसाठी यापूर्वीच 5 ऑगस्ट 2011 पासून नियुक्त केलेले आहे.

नागरी स्वराज्य संस्थांमधील हे अन्न निरीक्षक अन्न व औषध प्रशासनाच्या नियंत्रणाखाली असले तरीही त्यांचे वेतन तसेच सेवा विषयक बाबी नागरी स्वराज्य संस्थांकडून हाताळण्यात येतात. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन आणि नागरी स्वराज्य संस्था या दोन भिन्न यंत्रणाचे दुहेरी नियंत्रण आहे. या बाबींचा विचार करुन राज्यातील विविध नागरी स्वराज्य संस्थांकडे कार्यरत अन्न निरीक्षकांना अटी व शर्तींच्या अधीन राहून अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी, गट-ब (राजपत्रित) या पदावर कायमस्वरुपी सामावून घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे. तसेच, या अधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी या पदावर सामावून घेण्यासाठी नामनिर्देशनाच्या कोट्यातील आरक्षणाच्या प्रवर्गनिहाय 33 पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

या अधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनात सामावून घेतल्यानंतर त्यांची नागरी स्वराज्य संस्थांमधील नियमित सेवा शासकीय सेवेत जोडून देण्यात येणार असून त्यांच्या समावेशनानंतर त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाचे सर्व सेवानियम, आदेश, परिपत्रके इत्यादी लागू राहतील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget