(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन | मराठी १ नंबर बातम्या

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई ( १ मे ) : महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर बाबुभाई भवानजी, मुख्य सचिव डी.के.जैन, पोलीस महासंचालक सतीश माथुर,पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, अतिरिक्त मनपा आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त (परिमंडळ-1) विजय बालमवार, नगरसेविका सुजाता सानप यांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अभिवादन केले आणि कामगार व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार या अभियानास लोकसहभागाची जोड मिळाल्यामुळे विकास वेगाने होत असल्याचा अनुभव आपल्याला येत आहे. राज्याची परिस्थिती लक्षात घेवून पाण्याचा अपव्यय टाळावा व उपलब्ध जलसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी जलसाक्षरता संकल्पना राबविण्यासाठी कटिबद्ध होऊ या असे आवाहन नाईक-निंबाळकर यांनी यावेळी केले.

58 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवनाचा आसमंत सनई-चौघडा व तुतारीच्या निनादाने मांगल्य आणि उत्साहाने बहरून गेला होता. या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सदस्य संजय दत्त, नरेंद्र पाटील, तसेच विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सहसचिवअशोक मोहिते, उपसचिव विलास आठवले आदींसह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यावेळी मानवंदना दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget