(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी | मराठी १ नंबर बातम्या

सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी

मुंबई ( २१ मे २०१८ ) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेला आहे. सदरच्या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकारी यांचेकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्य दलात अधिकारी पदासाठी इच्छूक असणाऱ्या तसेच ज्या नवयुवक व युवतींना सशस्त्र सैन्य दलाकडून एम.एस.बी. परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी दि. 5 जून ते 14 जून 2018 (एकूण 10 दिवस) असा आहे. प्रशिक्षण कोर्सच्या कालावधीत निवासाची, प्रशिक्षणाची व भोजनाची सोय विनामुल्य करण्यात आलेली आहे.

तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेणेसाठी दि. 01 जून 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे. खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता धारण करीत असतील अशाच उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित रहावे.

(अ) कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE/UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA/UPSC) पास झालेली असावी, व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

(ब) एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.

(क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

(ड) युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय, परिसर, नाशिकरोड, नाशिक, यांचा दुरध्वनी क्र. 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget