(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बाजार व उद्यान समिती अध्‍यक्षांनी केली शिवाजीनगर येथील भुखंडाची पाहणी | मराठी १ नंबर बातम्या

बाजार व उद्यान समिती अध्‍यक्षांनी केली शिवाजीनगर येथील भुखंडाची पाहणी

मुंबई ( १४ मे २०१८ ) : बाजार व उद्यान समितीचे अध्‍यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान यांनी ९० फि‍ट‍ रोड, शिवाजी नगर, गोवंडी येथील महानगरपालिकेच्‍या भूखंडाची नुकतीच पाहणी करुन सदरहू जागा ताब्‍यात घेऊन तेथे उद्यान विकसित करण्‍याची सूचना महापालिका अधिकाऱयांना केली.

बाजार व उद्यान समितीचे अध्‍यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान यांनी महापालिका अधिकाऱयांना सांगितले की, सदर भुखंड गत १६ वर्षापासून बेस्‍टच्‍या ताब्‍यात मोकळा असल्‍यामुळे या भुखंडाचा गैरवापर होत असून ही
जागा २०१४- २०३४ च्‍या प्रारुप विकास आराखडयात महानगरपालिकेच्‍या उद्यानाकरिता आरक्षित करण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सदर जागा ताब्‍यात घेण्‍यासाठी बेस्‍ट समिती अध्‍यक्ष आशिष चेंबुरकर
यांची लवकरच भेट घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

याप्रसंगी स्‍थानिक नगरसेविका शायरा खान, ‘ एम/पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त श्रीनिवास किलजे, पी.जी.गोसावी, उप उद्यान अधिक्षक परमेश्‍वर सावळकर हे उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget