(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ऐक्यदर्शन सहकारी गृहनिर्माण मंडळ : संक्रमण शिबीरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा निर्णय बैठकीत | मराठी १ नंबर बातम्या

ऐक्यदर्शन सहकारी गृहनिर्माण मंडळ : संक्रमण शिबीरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा निर्णय बैठकीत

मुंबई ( १५ मे २०१८ ) : काळेवाडी येथील संक्रमण शिबीरात रहाणार्‍या ऐक्यदर्शन सहकारी गृहनिर्माण मंडळातील रहिवाशांना पुनर्वसन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्याबाबत संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी येथील रहिवाशांना भेटी दरम्यान दिले.

ऐक्यदर्शन सहकारी गृहनिर्माण मंडळाचे १०५ सभासद २०१५ पासून म्हाडाने प्रस्तावित केलेल्या ९५ ए च्या कारवाईमुळे काळेवाडी, धोबिघाट, ग.द. आंबेकर मार्ग येथे वास्तव्य करीत आहेत. विकासक मेसर्स अवर्सेकर ऍन्ड सन्स यांनी दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या जुन्या व मोडकळीस आलेल्या संक्रमण शिबीरामध्ये वास्तव्य करीत आहे. येत्या पावसाळ्यामध्ये या संक्रमण शिबीरामध्ये राहणे रहिवाशांना खूपच त्रासदायक ठरणार असल्याचे तक्रार मंडळाच्या रहिवाशांनी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे केली होती. विकासकांनी ४ ए या इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करावे व ४ बी या इमारतीचे सुरू केलेले बांधकाम सध्या पूर्णपणे थांबलेले असल्यामुळे ते काम देखिल तातडीने सुरु करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही मंडळाचे अध्यक्ष हर्षद शेट्ये यांनी राज्यमंत्री यांच्याकडे केली. शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या विनंतीवरुन राज्यमंत्री वायकर यांनी सोमवारी येथील संक्रमण शिबीरातील इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार अजय चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळाचे अधिकारी जोशी, म्हाडाचे अन्य अधिकारीही उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री वायकर यांनी स्थानिक जनतेची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचबरोबर संक्रमण शिबीरातील घरांची पहाणीही केली. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी पुनर्वसन इमारतीच्या कामांचीही पहाणी केली. यानंतर संक्रमण शिबीरात रहाणार्‍या रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत स्थानिक आमदार, विकासक, म्हाडाचे अधिकारी तसेच स्थानिक रहिवाशी यांची संयुक्त बैठक घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी येथील रहिवाशांना दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget