मुंबई ( १० मे २०१८ ) : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ४ एप्रिल २०१८ रोजी कमला मिल आग दुर्घटनेची चौकशी करण्याच्या अनुषंगाने त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीचा पाहणी दौरा शनिवार १२ मे २०१८ रोजी सकाळी ११. ३० वाजता होणार आहे. दि. २९ व ३० डिसेंबर २०१७ च्या मध्यरात्री लोअर परेल, कमला मिल कंपाऊडमधील वन अबोव्ह व मोजो बिस्ट्रो या दोन रेस्टॉरेन्टला आग लागली होती. या घटनेवरुन मा. उच्च न्यायालयाने ही चौकशी समिती गठीत केली होती. त्रिसदस्यीय चौकशी समिती शनिवार, दि. १२ मे २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता घटनास्थळाची पाहणी करणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा