मुंबई ( १ मे ) : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हुतात्मा चौकात कामगार भेटले आणि त्यांनी आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या.
महाराष्ट्र मधील अनेक असंख्य कामगार असे आहेत की, ज्यांना काम करताना अपंगत्व आले आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी त्या आस्थापनाने कंपनीने कोणतीही सुविधा किंवा नुकसान भरपाई किंवा मोबदला दिलेला नाही. सदर बाब महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेनाचे प्रदेश सरचिटणीस गजानन नारायण राणे आणि मनकासे अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना या गंभीर प्रश्नांची माहिती देण्यात आली.
मनकासे संलग्न औ. अपघातग्रस्त कामगार संघटना अध्यक्ष कैलास मोरे आणि मनकासे चिटणीस अंकुश पवार यांनी यावेळी कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली. "कामगारांच्या समस्यांवर लवकरच लक्ष घालू" असे राज ठाकरे यांनी यावेळी कामगारांना सांगितले. या प्रसंगी कामगार सेनेचे राकेश तारापूरकर, निलेश पाटील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा