मुंबई ( २३ मे २०१८ ) : माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/पाकीटे/मालाची घरपोहच वाहतूक करणारी कंपनी तसेच मालाची साठवणुक करणारे कुरिअर वितरक माल जमा करणारे व्यावसायिक यांना कॉमन कॅरिअर म्हणून क्षेत्रिय नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे अर्ज करुन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे, असे परिवहन आयुक्तालयाने कळविले आहे.
उपरोक्त सर्व संबधितांनी संबधित उप/प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून हे नोंदणी प्रमाणपत्र दि. 31 मे 2018 पर्यंत प्राप्त करुन घ्यावे, अन्यथा मोटार वाहन अधिनियम तसेच नियमातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल.
कॅरेज बाय रोड अधिनियम, 2007 च्या अनुषंगाने केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांचे अधिसूचना क्र.जीएसआर-176 (ई) दि.28.02.2011 नुसार कॅरेज बाय रोड नियम, 2011 प्रसिद्ध करण्यात आले असून हे नियम अधिसुचना प्रसिद्ध होण्याच्या दिनांकापासून लागू झाले आहेत. हे नियम केंद्र शासनाच्या www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

टिप्पणी पोस्ट करा