(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सागरी मत्स्यव्यवसायाबाबत प्रशिक्षण 18 जूनपर्यंत अर्ज करावेत | मराठी १ नंबर बातम्या

सागरी मत्स्यव्यवसायाबाबत प्रशिक्षण 18 जूनपर्यंत अर्ज करावेत

मुंबई ( २२ मे २०१८ ) : ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या दि. 18 जून पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याचे प्रशिक्षण
वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. 2018-2019 या वर्षातील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2018 या 6 महिन्याच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी
प्रत्येक माहिन्यासाठी 450 रुपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा 100 रुपये इतके प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.

प्रशिक्षणार्थी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. प्रशिक्षणार्थी क्रियाशिल मच्छीमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे. पोहता येणे आवश्यक आहे. किमान 4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक कार्ड धारक किंवा आधार कार्डधारक असावा. संबंधित संस्थेच्या शिफारसीसह विहित परिपूर्ण अर्ज असावा. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची साक्षाकिंत प्रत जोडणे आवश्यक आहे.

निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक मच्छ‍िमारांनी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे दि. 18 जून 2018 पर्यंत करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget