मुंबई ( २ मे ) : मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या दि 2 मे रोजी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यलयावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.त्यानुसार रिपाइं च्या मुंबई आणि ठाणे प्रदेशच्या वतीने संयुक्तरित्या उद्या दि 2 मे रोजी दुपारी 1 वाजता मुंबईत बांद्रा पूर्व येथील जिल्हा अधिकारी कार्यालयावर रिपाइं चा प्रचंड मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्च्यात रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सामील होऊन शक्तिप्रदर्शन घडवावे असे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
भिमाकोरेगाव प्रकरणी षडयंत्र रचणाऱ्या आरोपींना अटक झाली पाहिजे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही.त्यामुळे जर संभाजी भिडे यांचा या षडयंत्रात हात असेल तर त्यांनाही मिलिंद एकबोटे प्रमाणे अटक करा. भिमाकोरेगाव हिंसाचाराची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या पूजा सुरेश सकट हिची हत्याच झाली असून मारेकऱ्यांवर कलम 302 अन्वये खुनाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे.
भिमाकोरेगाव प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र बंद मधील आंदोलकांवरील खटले काढून घेण्यात यावेत.
ऍट्रॉसिटी कायद्याला धक्का लागता कामा नये. एट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल न करता या कायद्याचे संपूर्ण संरक्षण झालेच पाहिजे.
ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर दलित व आदिवासिंविरुद्ध कलम 395 नुसार दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवरही कठोर कारवाई झालीच पाहिजे ; मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी लवकर संसदेत कायदा करा . अनुसूचित जाती जमाती; ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे.
जम्मू काश्मीर मधील कठुआ ; उत्तर प्रदेश मधील उन्नाव तसेच देशभरातील अनेक ठिकाणी अल्पवयिन मुलींवर बलात्कार करून त्यांची क्रूर हत्या करणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.दलित ; अल्पसंख्यांक व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, या मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या दि 2 मे रोजी राज्यभरातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईत उद्या दि 2 मे रोजी दुपारी 1 वाजता मोर्चाला म्हाडा वांद्रे कार्यालय येथून सुरवात होऊन तो बांद्रा येथेच मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यलयावर येईल. रिपाइं मुंबई प्रदेश आणि ठाणे प्रदेश तर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व ना. रामदास आठवले स्वतः करणार आहेत. मोर्चा विसर्जित होण्या पूर्वी संविधान बंगला या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येईल. तरी या मोर्चाला हजारोच्या संख्येने आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे आणि ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेश बारशिंग यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा