मुंबई ( १९ मे २०१८ ) : बृहन्मुंबई महानगरपलिकेच्या दुकाने व आस्थापना खात्याकडून ऑनलाईनद्वारे आस्थापना नोंदणी, सूचनापत्रपावती, आस्थापनाचे नूतनीकरण व आस्थापनेतील बदलाची सुचनाबाबत इत्यादी सेवा विनाशुल्क, विनाकागदपत्र पडताळणी व स्थळ निरीक्षणाशिवाय तात्काळ पुरविल्या जात आहेत. तसेच या सेवा सोईस्कर, पारदर्शी व त्वरित करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या वतीने विविध्ा परवानग्या व मंजुरी ‘ईज ऑफ डय़ुईंग’ संकल्पनेनुसार थेट व ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. ही सेवा मुंबई महानगरपालिकेच्या www.portal.mcgm.gov.in व www.mcgm.gov.in या संकेत स्थळवर उपलब्ध होणार आहे.
० ते ९ कामगार असलेल्या आस्थापनांनी ऑनलाईनद्वारे सुचनापत्रासाठी अर्ज केल्यास विनाशुल्क सुचनापत्र पावती ऑनलाईनद्वारेच त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठविली जाणार आहे. सदर सुचनापत्र विनाकागदपत्र पडताळणी तसेच स्थळ निरीक्षणाशिवाय तात्काळ दिले जाते. सुचनापत्राकरिता पॅनकार्डची स्कॅन कॉपी बंधनकारक नाही. तसेच ० ते ९ कामगार असलेल्या आस्थापनांमध्ये ज्यावेळी १० किंवा त्यापेक्षा अधिक कामगार होतील त्यावेळी नोंदणीप्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
१० व १० पेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांनी ऑनलाईनद्वारे नोंदणी प्रमाणपत्राकरीता अर्ज केल्यास नोंदणीप्रमाण पत्र विनाशुल्क विना कागदपत्र पडताळणी व स्थळ निरीक्षणाशिवाय त्यांनी नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर त्वरित देण्यात येते. नोंदणी प्रमाणपत्रासाठी पॅनकार्डची स्कॅन कॉपी बंधनकारक नाही. या सुधारणांमुळे नविन दुकाने व आस्थापनांना नोंदणी करणे सोईस्कर, पारदर्शी व त्वरित झालेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा