(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज एम. डी (पॅथॉलॉजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ | मराठी १ नंबर बातम्या

डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज एम. डी (पॅथॉलॉजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ

मुंबई ( १९ मे २०१८ ) : अमरावतीच्या डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज येथे एम. डी (पॅथालॉजी) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत 2 वरून 7 एवढी वाढ करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे.

केंद्र शासनाने दिलेली मान्यता विचारात घेऊन राज्यशासनाने डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज या संस्थेस सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. यात प्रवेशाकरिता निश्चित केलेली कार्यपद्धती वापरणे, शैक्षणिक शुल्क आकारणीसाठीची कार्यपद्धती अनुसरणे, महाराष्ट्र एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स (प्रोव्हिबिशन ऑफ कॅपिटेशन फी) ऍक्ट, 1987 मधिल तरतुदींचे पालन करणे आदिंचा समावेश आहे. या संस्थेस कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आली असून गुणवत्तेवर आधारित प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या याद्याप्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मंजूर करून घेणे आवश्यक राहणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget