(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); एव्हरेस्टवीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास विभाग स्वीकारणार | मराठी १ नंबर बातम्या

एव्हरेस्टवीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास विभाग स्वीकारणार

मुंबई, दि. 30 : मिशन शौर्य मध्ये आश्रमशाळेतील दहा पैकी पाच आदिवासी विद्यार्थ्यानी एव्हरेस्ट सर केले. दि. 16 मे रोजी कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रमेश आळे आणि मनिषा धुर्वे या पाच विद्यार्थ्यानी एव्हरेस्ट सर केले. त्यांनी केलेल्या या उत्तुंग कामगिरीबदल या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील उच्चशिक्षणाची जबाबदारी आदिवासी विकास विभाग घेणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.

आदिवासी मुलामुलींमधील उपजतच असलेल्या काटक व कणखरपणाला वाव मिळावा. साहसी खेळासोबतच त्यांच्यातील कलागुणांचा देखील विकास व्हावा यासाठी लवकरच सर्वकष धोरण बनविण्याचा विचार सुरू असल्याचे ही सवरा यांनी सांगीतले.

मिशन शौर्यमधील विद्यार्थ्यानी मिळवलेले यश हे विभागाची प्रतिमा उंचावणार असल्याचे तसेच भविष्यात ही अश्या पध्दतीचे धाडसी मोहिमांचे आयोजन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी करण्याचा विचार असल्याचे ही त्यांनी सांगितले. 11 एप्रिल पासुन या विद्यार्थ्याच्या एव्हरेस्ट मिशनला सुरवात झाली होती व 28 मे रोजी हा संपुर्ण चमू मुंबईत पोहोचला. 45 दिवसांच्या या मोहिमेत या विद्यार्थ्याच्या मानसिक व शारिरीक क्षमतांची संपूर्ण कसोटी लागली.

दि.31 मे रोजी या मोहिमेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत. तर 1 जुन रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या इतिहासात पहिल्यांदा अश्या प्रकारचा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला. या मुलांनी देखील ही मोहिम यशस्वी केली. त्यामुळे विभागातर्फे यशस्वी विद्यार्थ्याना 25 लाख रुपयांचे तर बेसकॅम्प पर्यत पोहोचलेल्या विद्यार्थ्याना दहा लाख रू रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याचे प्रधानसचिव मनिषा वर्मा यांनी सांगितले. यावेळी या विद्यार्थ्यापैकी मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, कविदास कातमोडे, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया अत्राम यांनी मोहिमेदरम्यानचे थरारक,रोमहर्षक अनुभव सांगितले.

प्रशीक्षक बिमला नेगी- देऊस्कर,अविनाश देऊस्कर,शेखरबाबु,डॉ. वाईकर यांनीही या मुलांच्या एव्हरेस्ट मोहीमेचा प्रवास यावेळी उलगडुन दाखवला.

विकास ख-या अर्थाने हिरो....

वेगवान वारे,थंड हवामान,बर्फ या सगळयामुळे आकाश या विदयार्थ्याला त्रास झाला. तेव्हा टीम स्पिरीट दाखवत त्याला पुन्हा घेवून ॲडव्हॉन्स बेस कॅम्प वर सुखरूप आणून विकास सोयामने परत जावून शिखर सर केले..त्यामुळे तोच या मोहिमेचा खरा हिरो असल्याचे मनिषा वर्मा यांनी सांगीतले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget