मुंबई ( १५ मे २०१८ ) : विधान भवनात आज झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल नियुक्त डेसमंड नॉर्मन रॉस येट्स यांची विधान सभेवर नामनियुक्ती झाल्याबद्दल शपथविधी झाला. विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डेसमंड येट्स यांना शपथ दिली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट, आमदार राज पुरोहित, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा