(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राष्ट्रीय मानव अधिकार आयोगातर्फे लघुपट स्पर्धेचे आयोजन | मराठी १ नंबर बातम्या

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगातर्फे लघुपट स्पर्धेचे आयोजन

मुंबई ( २० मे २०१८ ) : राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या वतीने मानव अधिकार विषयावरील चौथ्या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी लघुपट पाठविण्याची अंतिम तारीख 2 जुलै 2018 आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी लघुपट पाठविण्याचे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या वतीने मानव अधिकाराचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही भारतीय भाषेतील लघुपट पाठविता येणार असून इंग्रजी उपशीर्षक असणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामुल्य असून लघुपट हा कमीत कमी 3 मिनीटे व जास्तीत जास्त 10 मिनिटाचा असावा. इच्छुकांनी आपला प्रवेश अर्ज 2 जुलै 2018 पूर्वी उपसंचालक (माध्यम व संवाद), आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोग, मानव अधिकार भवन, सी ब्लॉक, जीपीओ संकुल, नवी दिल्ली-110023 या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget