(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघाचा द्विवार्षिक निवडणुक कार्यक्रम स्थगित | मराठी १ नंबर बातम्या

विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघाचा द्विवार्षिक निवडणुक कार्यक्रम स्थगित

मुंबई ( १४ मे २०१८ ) : भारत निवडणूक आयोगाने दि. 14 मे 2018 च्या प्रसिद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या ‍द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकरिता लागू करण्यात आलेली आचारसंहिता मागे घेण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि. 12 मे 2018च्या प्रसिद्धीपत्रकान्वये मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण विभाग पदवीधर व नाशिक विभाग शिक्षक या मतदार संघाचा द्विवार्षिक कार्यक्रम घोषित केला होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget