(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जगातील सात आश्‍चर्यांच्‍या प्रतिकृतींचा समावेश असलेल्‍या जोसेफ बाप्‍टीस्‍टा | मराठी १ नंबर बातम्या

जगातील सात आश्‍चर्यांच्‍या प्रतिकृतींचा समावेश असलेल्‍या जोसेफ बाप्‍टीस्‍टा

मुंबई ( १५ मे २०१८ ) :जोसेफ बाप्‍टीस्‍टा उद्यानामध्‍ये जगातील सात आर्श्‍यांच्‍या प्रतिकृती साकारण्‍यासोबतच महापालिका अधिकाऱयांनी उद्यानाचा सर्वांगीण विकास करावा जेणेकरुन मुंबईकरांसाठी चांगले पर्यटनस्‍थळ म्‍हणून हे उद्यान नावारुपास येईल, असे प्रतिपादन स्‍थायी समिती अध्‍यक्ष व स्‍थानिक नगरसेवक यशवंत जाधव यांनी केले.

जगातील सात आश्चर्यांच्‍या प्रतिकृतींचा समावेश नव्‍याने नुतनीकरण करण्‍यात येणाऱया जोसेफ बाप्‍टीस्‍टा उद्यानामध्‍ये करण्‍यात येणार असून या कामाचे भूमिपूजन स्‍थायी समिती अध्‍यक्ष व स्‍थानिक नगरसेवक यशवंत जाधव यांच्‍या हस्‍ते व महापालिका उप आयुक्‍त डॉ. किशोर क्षीरसागर (आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व उद्याने) यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक १५ मे २०१८) सकाळी पार पडले, त्‍यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते.

याप्रसंगी उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी ) प्रकाश कदम, ई विभागाचे सहाय्यक आयुक्‍त साहेबराव गायकवाड तसेच संबधित अधिकारी उपस्थित होते.

भंडारवाडा जलाशय, माझगाव येथील जलाशयाच्‍या टेकडीवर हे जोसेफ बाप्‍टीस्‍टा उद्यान असून या उद्यानामध्‍ये जगातील सात आश्‍चर्यांमध्‍ये ख्रिस्‍टरिओचा पुतळा, पिसाचा झुकता मनोरा, मेक्‍सीकोतील चिचेन इल्‍झा, आयफेल टॉवर, रोमन कोलोझि‍म, स्‍टॅुच्‍यु ऑफ लिबर्टी, ताजमहल या सात आश्‍चर्यांचा शिल्‍पाकृतींचा समावेश करण्‍यात येणार आहे. त्‍यासोबतच आवश्‍यक असणारे फॅ‍ब्रिकेशनचे काम व पाया बांधणे, स्‍टेनलेस स्‍टीलचे कुंपण बसविणे, सूचना फलक बसविणे, शिल्‍पाकृतींच्‍या सभोवताली रंगीत दिवाबत्‍ती/ रोषणाई व उद्यानवि‍षयक हिरवळ, सुशोभिकरणे करणे आदीं कामाचा समावेश आहे. या कामासाठी अंदाजित दीड कोटी रुपये खर्च येणार असून हे काम सहा महिन्‍याच्‍या कालावधीत पूर्ण करण्‍याचे प्रस्‍तावित आहे.

स्‍थायी समिती अध्‍यक्ष व स्‍थानिक नगरसेवक यशवंत जाधव बोलताना पुढे म्‍हणाले की, माजी नगरसेविका श्रीम.यामिनी जाधव यांची सात आश्‍चर्यांच्‍या समावेश असलेले उद्यान विकसित करण्‍याची ही संकल्‍पना
असून त्‍यांनी त्‍यांच्‍या नगरसेवक पदाच्‍या कालावधीत यासाठी प्रयत्‍न केले होते. याठिकाणी व्‍हिंव्‍हीग गॅलरी सुध्‍दा विकसित करण्‍यात येणार आहे. त्‍यासोबतच याठिकाणी शंभर फुटाचा तिरंगा ध्‍वज उभा करणार असून
प्रवेशव्‍दाराचे सुध्‍दा सुशोभिकरण जलखाते व उद्यान खाते हे संयुक्‍तपणे करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

महापालिका उप आयुक्‍त डॉ. किशोर क्षीरसागर (आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व उद्याने)यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, हे उद्यान मुंबईकरांसाठी चांगले पर्यटनस्‍थळ म्‍हणून विकसित करण्‍याचा महापालिका प्रयत्‍न करणार असून उद्यानाचा सर्वांगीण विकास करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.प्रारंभी, मान्‍यवरांनी संपूर्ण उद्यानाची पाहणी करुन सोयीसुविधांचा आढावा घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget