मुंबई ( ८ मे २०१८ ) : 26 व्या वस्तू व सेवा कर परिषदेत झालेल्या निर्णयानुसार दि. 1 एप्रिल 2018 पासून वस्तूंच्या आंतरराज्य वाहतुकीसाठी ई-वे बिल पद्धतीचा अवलंब सुरु झालेला आहे. तथापि, राज्यांतर्गत वाहतुकीसाठी ई-वे बिल पद्धतीची अंमलबजावणी विविध राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचे ठरविण्यात आले होते.
त्यानुसार राज्यामध्ये 50 हजार पेक्षा जास्त मुल्यांच्या वस्तूंच्या राज्यांतर्गत वाहतुकीसाठी दि. 25 मे 2018 पासून ई-वे बिल पद्धती अनिवार्य करण्यात येत आहे. त्याबाबतची अधिसूचना राज्यकर आयुक्त यांनी दि. 7 मे 2018 रोजी जारी केली आहे. ही अधिसूचना विभागाच्या www/mahagst.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील सर्व करदाते आणि वाहतुकदार यांनी यासाठीची आवश्यक ती नोंदणी अद्याप केली नसल्यास https://www.ewaybillgst.gov.in या संकेतस्थळावर ती तातडीने करावी, असे आवाहन राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा