(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्‍यांच्‍या राजधान्‍यांच्‍या श्रेणीत ‘ मुंबई महापालिका’ प्रथम | मराठी १ नंबर बातम्या

राज्‍यांच्‍या राजधान्‍यांच्‍या श्रेणीत ‘ मुंबई महापालिका’ प्रथम

मुंबई ( १६ मे २०१८ ) : बृहन्‍मुंबई महापालिका करीत असलेल्‍या कामांची दखल केंद्रसरकाराने घेऊन ‘स्‍वच्‍छता सर्वेक्षण २०१८ ’ च्‍या राज्‍यांच्‍या राजधान्‍यांच्‍या श्रेणीमध्ये मुंबई शहराने प्रथम क्रमांक पटकाविल्‍याबद्दल मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी नगरसेवक, महापालिका प्रशासन व मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारच्‍या स्‍वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्‍वच्‍छता सर्वेक्षण २०१८’ मध्‍ये मुंबई शहराने प्रथम क्रमांक पटकाविल्‍यानंतर महापौर प्रिं विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज (दिनांक १७ मे, २०१८) पालिका मुख्‍यालयातील महापौर दालनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, त्‍यावेळी ते बोलत होते. महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर प्रसारमाध्‍यमांशी संवाद साधताना म्हणाले की, स्‍वच्‍छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत मुंबई शहराला एकूण चार हजार गुण सेवास्‍तर प्रगती, थेट निरिक्षण, आणि नागरिकांचा अभिप्राय अंतर्गत प्राप्‍त झाले असल्‍याचे महापौरांनी सांगितले. ‘स्‍वच्‍छता सर्वेक्षणात’ देशातील चार हजार ४१ शहरांचे सर्वेक्षण करण्‍यात आले होते. स्‍वच्‍छ भारत अभियानातंर्गत शहरी भागातील स्‍वच्‍छतेचे मुल्‍यांकन करण्‍यासाठी
स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. मुंबई शहरात निर्माण होणारा कचरा हा नऊ हजार मेट्रीक टनावरुन सात हजार मेट्रीक टनावर आला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. बृहन्‍मुंबई महापालिका करीत असलेल्‍या स्‍वच्‍छता कामात शंभर टक्‍के यशस्‍वी झाली नसली तरी जनतेच्‍या सहकार्याने भवि‍ष्यात सर्व स्‍तरावर प्रथम येऊ असा आशावाद त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

राज्‍याच्‍या राजधान्‍यांच्‍या श्रेणीत मुंबई महापालिका प्रथम आल्‍याबद्दल महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप मारणे आपले कर्तव्‍य असून स्‍वच्‍छ, सुंदर, हरीत व सुरक्षित मुंबई निर्माण करण्‍याचा आम्‍ही प्रयत्‍न करु असेही ते शेवटी म्‍हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget