नवी दिल्ली ( १४ मे २०१८ ) : स्वकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणा-या व समाजात बदल घडवून आणणा-या महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यासाठी नीती आयोगाच्यावतीने देण्यात येणा-या ‘वुमेन ट्रान्सफॉर्मींग इंडिया अवार्ड २०१८’ साठी आवेदन मागविण्यात आले आहेत. आवेदनाची अंतिम तारीख ३० जून २०१८ आहे.
नीती आयोगाच्यावतीने दरवर्षी ‘वुमेन ट्रान्सफॉर्मींग अवार्ड’ देण्यात येतो. ‘महिला आणि उद्योजकता’ असा यावर्षीच्या पुरस्काराचा विषय असून पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. नीती आयोग व संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात येणार आहे. नुकतेच निती आयोगाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमीताभ कांत आणि संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील निवासी समन्वयक युरी अफानसासीइव यांनी या पुरस्कारासाठी देशभरातील महिला उद्योजिकांना आवेदन करण्याचे आवाहन केले आहे.
महिलांमधील शक्ती ओळखून त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा योग्य सन्मान करण्यासाठी व लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी नीती आयोगाच्यावतीने देशातील कर्तृत्चवान महिला उद्योजिकांना ‘वुमेन ट्रान्सफॉर्मींग अवार्ड’ प्रदान करण्यात येतो. विविध अडचणींचा सामना करत पंरपरागत चाकोरी मोडीत काढणा-या देशातील महिला उद्योजिकांकडून या पुरस्कारासाठी आवेदन मागविण्यात आले आहेत. तसेच, या उद्योजिकांकडून महत्वाच्या विकास कामांपुढील आव्हानांबाबत उपाय योजना सुचविण्याचे
आवाहनही यासोबत करण्यात आले आहे.
आवेदक स्वत: आपला अर्ज https://wep.gov.in या संकेतस्थळावर करू शकतात. तसेच 7042648877 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल करून आवेदकांना आवश्यक माहिती व मदत करण्यात येणार आहे. ३० जून २०१८ ही आवेदनाची अंतिम तारीख आहे.

टिप्पणी पोस्ट करा