(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राष्ट्रपतींच्या हस्ते तीन मराठी वैज्ञानिकांचा सन्मान | मराठी १ नंबर बातम्या

राष्ट्रपतींच्या हस्ते तीन मराठी वैज्ञानिकांचा सन्मान

नवी दिल्ली ( १६ मे २०१८ ) : भूविज्ञान क्षेत्रातील महत्वपूर्ण संशोधनासाठी नरेंद्र नितनवरे, डॉ.साहेबराव सोनकांबळे आणि अमीत धारवाडकर या मराठी वैज्ञानिकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाच्यावीने येथील विज्ञान भवनात ‘ राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार-२०१७’ वितरणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी खनिकर्म मंत्रालयाच्या विविध संशोधन संस्थामध्ये कार्यरत २२
वैज्ञानिकांना भूविज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.यावेळी केंद्रीय ख‍निकर्म मंत्री नरेंद्र सिंह तोमर, खनिकर्म राज्यमंत्री हरीभाई पार्थीभाई चौधरी आणि मंत्रालयाचे सचिव
अनिल मुकीम मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात ३ मराठी वैज्ञानिकांचा सन्मान करण्यात आला.

चंद्रपूर जिल्हयातील मिनझारी येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण केंद्राचे उपमहासंचालक व वैज्ञानिक नरेंद्र नितनवरे यांनी आर्थिक महत्वाच्या खनिजांचा शोध लावला आहे. त्यांनी या शोधासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण केंद्राच्या पाच सदस्यीय वैज्ञानिकांच्या संघात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या कार्यक्रमात नितनवरे यांचा सन्मान करण्यात आला.तीन लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून
हा सांघिक पुरस्कार आहे.

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे वैज्ञानिक डॉ. साहेबराव सोनकांबळे यांनी देशात हेलीबॉर्न विद्युत चुंबकिय सर्वेक्षणाच्या माध्यमातून भूजल संशोधनात उल्लेखनीय
कार्य केले आहे. त्यांनी या शोधासाठी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या चार सदस्यीय वैज्ञानिकांच्या संघात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या कार्यक्रमात सोनकांबळे यांचा सन्मान करण्यात आला. तीन लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून हा सांघिक पुरस्कार आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे संचालक व वैज्ञानिक अमीत धारवाडकर यांनी अंटार्कटिक व आर्कटिक मोहिमेत भाग घेऊन आपल्या चार सदस्यीय वैज्ञानिकांच्या संघासह अंटार्कटिक व आर्कटिक संशोधन क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी आज त्यांना सन्मानित करण्यात आले. तीन लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून हा सांघिक पुरस्कार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget