(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मानवी जीवनात व्यक्तिमत्व विकासाला अनन्य साधारण महत्व - विपणन सदस्य अरविंद मोरे | मराठी १ नंबर बातम्या

मानवी जीवनात व्यक्तिमत्व विकासाला अनन्य साधारण महत्व - विपणन सदस्य अरविंद मोरे

रायगड जिल्ह्यातील शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

पनवेल (प्रतिनिधी) : माणसाचा स्वभावातून त्याचे व्यक्तिमत्व दिसून येत असून जन्मापासून मृत्यूपर्यंत ही प्रक्रिया चालते, त्यामुळे मानवी जीवनात व्यक्तिमत्व विकासाला अनन्य साधारण महत्व आहे, असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक विपणन सदस्य अरविंद मोरे यांनी येथे केले.
पनवेल शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने सीईटी उपक्रमांतर्गत 'व्यक्तिमत्व विकास' या विषयावर रायगड जिल्ह्यातील शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून अरविंद मोरे बोलत होते. शासकीय अध्यापक महाविद्यालयात झालेल्या या कार्यशाळेचे उदघाट्न कोकण शिक्षण विभागाच्या सहसंचालक व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. महाविद्यायाचे समन्वयक डॉ. रमेश भोसले, डॉ. सुनीता लोंढे आदी उपस्थित होते. 

यावेळी प्रा. डॉ. रमा भोसले यांनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आयोजनाबाबत उद्देश विशद केला.
कार्यशाळेचे मार्गदर्शक अरविंद मोरे यांनी शिक्षकांना संबोधताना, व्यक्तिमत्व विकासाचे पैलू समजावून सांगितले. स्वतः पुढाकार घेतला तरच व्यक्तिमत्व घडू शकते असे त्यांनी नमूद करून प्रत्येकाने स्वतः चे व्यक्तिमत्व घडविले पाहिजे, असे सांगितले. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारिरीक, मानसिक यंत्रणेची संघटना असून व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळा बेरीज आहे. शिक्षकांचे व्यक्तिमत्व, विविध विषयांचा अभ्यास, परीपाठ, अभ्यासपूरक व सहशालेय कार्यक्रम, खेळ, क्रिडा, कवायती इत्यादींचा मुलांच्या वर्तनावर परिणाम होऊन त्यांचे व्यक्तिमत्व घडू लागते. प्रेमळ व कर्तव्यदक्ष शिक्षक आदर्श ठरतात. रागीट व लहरी शिक्षक आवडत नाहीत. सुख, दुःख, यश, अपयश, मान, अपमान इत्यादी अनुभव आता प्रकर्षाने येऊ लागतात व या सर्वांचा व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होऊ लागतो. उत्तम शालेय वातावरण व आदर्श शिक्षक यांचा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर निश्चितच चांगला परिणाम होतो. मुलांवर चांगले संस्कार घडावे यासाठी मुल्य शिक्षण शिक्षकाने रुजविणे गरजेचे आहे. यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवून सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास उद्युक्त करण्याचे आवाहन अरविंद मोरे यांनी करून या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget