(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आज नवी मुंबईत पहिल्या आखिल भारतीय बौद्ध सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन | मराठी १ नंबर बातम्या

आज नवी मुंबईत पहिल्या आखिल भारतीय बौद्ध सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

नवी मुंबई ( २६ मे २०१८ ) : नवी मुंबई येथील लोक कलावंत मंचाच्या वतीने आखिल भारतीय बौद्ध सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी सांयकाळी 4 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत ऐरोली येथील सेक्टर 15 येथे सम्राट अशोकनगरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानात आयोजित करण्यात आले आहे.

महोत्सव 3 सत्रात संपन्न होणार आहे, असे महोत्सवाचे प्रमुख संयोजक गायक विष्णू शिंदे यांनी सांगितले. सकाळी 9 ते दुपारी 12 अखिल भारतीय लोककलावंताचे अधिवेशन हे पहिले सत्र असणार आहे. दुपारी 12 ते दुपारी 1 पर्यन्त भोजनदानचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दुपारी 2 ते सांयकाळी 4. 30 वाजेपर्यंत नवी मुंबई येथील साहित्य, कला, संस्कृती, पाली आणि बुध्दीझम विभाग सत्याग्रह महाविद्यालय द्वारे भारतीय संविधानावर आधारित सांस्कृतिक विविधेतून राष्ट्राची एकता यावर समूह नृत्य सादर करण्यात येणार आहे. डॉ. पुज्यभदंत उपगुप्त महाथेरो, पुज्यभदंत डॉ. एन. आनंद महाथेरो, पुज्यभदंत डॉ. ज्ञानरक्षित महाथेरो, पुज्यभदंत शांतीरत्न, पुज्यभदंत बोधीशील,पुज्यभदंत ज्योतिरत्न यांची धम्मदेशना होणार आहे. तसेच भारतीय संविधान यावर आधारित राज्यस्तरीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुले गीत रचना आणि गायनस्पर्धा होणार आहे. सांयकाळी 5 ते रात्रौ 10 वाजता यावेळेत गायक विष्णू शिंदे, आनंद कीर्तने, सुषमादेवी, विनोद विद्यागर, विश्वजित शिंदे, विद्रोही शाहीर राजा कांबळे, स्वीडनच्या जोहना जर्ल, स्पेनच्या सियेरा, पावा इंडिया यांचा बुद्धभिम गीताचे सादरीकरण होणार आहे.

बौद्ध संस्कृतीक चळवळीमध्ये विशेष योगदान दिलेल्या शिक्षण, संशोधन, लेखन, कला, संगीत, साहित्य, शाहिरी, गीतरचना, गायन, लोकगीते,पुरातत्व अवशेषांचा शोध आणि बौद्धांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते संस्था, संघटना यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget