(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नवी मुंबईत आखिल भारतीय बौद्ध सांस्कृतिक महोत्सव साजरा | मराठी १ नंबर बातम्या

नवी मुंबईत आखिल भारतीय बौद्ध सांस्कृतिक महोत्सव साजरा

नवी मुंबई ( २६ मे २०१८ ) : नवी मुंबई येथील लोक कलावंत मंचाच्या वतीने पहिल्यांदा आखिल भारतीय बौद्ध सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ऐरोली येथील सेक्टर 15 येथे सम्राट अशोकनगरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानात आयोजित करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे , आमदार संदीप नाईक , भदंत उपगुप्त महाथेरो , भदन्त डॉ खेमधम्मो महाथेरो , स्वीडनचे जोहान जर्ळ पावा इंडिया , स्पेनचे मारता सी बेरा , शाहीर राजा कांबळे,नगरसेवक संजू वडे , नगरसेविका हेमांगी सोनावणे, महोत्सवाचे संयोजक विष्णू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सव 3 सत्रात संपन्न झाले. अखिल भारतीय लोककलावंताचे अधिवेशन हे पहिले सत्र संपन्न झाले. त्यानंतर नवी मुंबई येथील साहित्य, कला, संस्कृती, पाली आणि बुध्दीझम विभाग सत्याग्रह महाविद्यालय द्वारे भारतीय संविधानावर आधारित सांस्कृतिक विविधेतून राष्ट्राची एकता यावर समूह नृत्य सादर करण्यात आले. डॉ. पुज्यभदंत उपगुप्त महाथेरो, पुज्यभदंत डॉ. एन. आनंद महाथेरो, पुज्यभदंत डॉ. ज्ञानरक्षित महाथेरो, पुज्यभदंत शांतीरत्न, पुज्यभदंत बोधीशील,पुज्यभदंत ज्योतिरत्न यांची धम्मदेशना पार पडली. त्यानंतर भारतीय संविधान यावर आधारित राज्यस्तरीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुले गीत रचना आणि गायनस्पर्धा संपन्न झाली. सांयकाळी विद्रोही शाहीर राजा कांबळे यांचा शाहिरी कार्यक्रम पार पड़ला.

तसेच यावेळी बौद्ध संस्कृतीक चळवळीमध्ये विशेष योगदान दिलेल्या शिक्षण, संशोधन, लेखन, कला, संगीत, साहित्य, शाहिरी, गीतरचना, गायन, लोकगीते,पुरातत्व अवशेषांचा शोध आणि बौद्धांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते संस्था, संघटना यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रा व्यंकट माने , प्रा अनिल गायकवाड , नारायण वाघमारे , सुरेश कोरे , बाळासाहेब डोळस ,सुधीर परमेश्वर , संदेश बनसोडे , शशिकला जाधव ,ऍड दीपक गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतल्याची माहिती लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे सरचिटणीस विश्वजित शिंदे यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget