पुणे ( १४ मे २०१८ ) : अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे दोघे आज सकाळी आगामी मस्का या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरकडे निघाले असता त्यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला आहे. या गाडीत अनिकेत, प्रार्थनासह ड्रायव्हर आणि प्रार्थनाची सहाय्यक होती. अपघातात प्रार्थनाच्या हाताला दुखापत झाली आहे. तिला लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा