(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); रिपब्लिकन पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशातून प्रचंड शक्तिप्रदर्शन | मराठी १ नंबर बातम्या

रिपब्लिकन पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशातून प्रचंड शक्तिप्रदर्शन

पुणे ( २८ मे २०१८ ) : रिपब्लिकन पक्षाची शाखा बौद्धवाड्यापूर्ती मर्यादित ठेऊ नका. बौद्धवाड्याची मर्यादा ओलांडून रिपब्लिकन पक्षाची शाखा गावात स्थापन करा. सर्व जाती धर्मियांना रिपब्लिकन पक्षात मानाचे स्थान आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, गरीब, भूमिहीन या सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी जातीधर्माचा भेदभाव झुगारून रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे. केवळ बौद्धांचा रिपाइं ही प्रतिमा पुसण्यासाठी मराठा बहुजन सवर्ण समाजाच्या मनात रिपब्लिकन पक्षाबद्दल विश्वास निर्माण करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

भिमाकोरेगाव प्रकरणानंतर झालेल्या उलटसुलट चर्चांमुळे केंद्रिय राज्यमंत्री आठवले यांच्या पाठीशी बहुसंख्य आंबेडकरी समाज आहे. त्यांच्या नेतृत्वातील रिपाइंची राज्यात ताकद आहे हे दाखवुन देण्यासाठी पुण्यात रिपाइंचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यत आले. त्यात रिपाइं कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून यशस्वी शक्तिप्रदर्शन घडविले. 

राज्यव्यापी अधिवेशन असल्याने राज्यभरातून रिपब्लिकन कार्यकर्ते पुण्यात दुपारपासूनच दाखल झाले होते. हातात निळे झेंडे, डोक्यावर निळ्या टोप्या आणि आयोजकांकडून सभास्थळी लावलेले झेंडे आणि फ्लेक्स यामुळे 'एसएसपीएमएस'वर निळाई अवतरली असे दिसत होते. 'रामदास आठवले तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'जय भीम', रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

रिपाइं राज्यव्यापी अधिवेशनात प्रचंड जनसमूहाला संबोधित करताना आठवले म्हणाले की, संविधानाचे रक्षण करण्यासाठीच मी केंद्रात मंत्रिपद सांभाळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संविधानाला, ऍट्रॉसिटी कायद्याला आणि दलित आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, याची काळजी मी घेत आहे. त्यामुळे राहुल गांधीजी आपण संविधानाची चिंता करू नये. त्यासाठी संविधान बचाव मोर्चा काढण्याऐवजी काँग्रेस बचाव असा मोर्चा काढावा. कारण येत्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील युती काँग्रेसला हद्दपार करणार आहे," असा टोला आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला.

ते म्हणाले की, संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला, तर मंत्रिपद सोडून देईन. समाज हिताच्या सर्व मागण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला मात्र मला बदनाम करणारे स्वतःच बदनाम झाले आहेत. या प्रकरणी संभाजी भिडे यांच्याबाबत समाजात संशयाची भावना आहे. त्यामुळे त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.

याप्रसंगी सीमाताई आठवले, कुमार जित आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार ऍड. राहुल कुल, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर, प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्यासह शहरातील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पँथर चळवळीवर आधारित 'पँथर' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

रिपब्लिकन पक्ष तळागाळातल्या लोकांचा आहे. कार्यकर्त्यांच्या फळीतून हा पक्ष उभा आहे. भाषण करून इथपर्यंत आलो नाही, तर कार्यकर्त्यांच्या जोरावर; प्रचंड संघर्ष करून येथवर आलो आहे. अनेक जन सोडून गेले; पण एक गेला आणि शंभर आले अशी आपल्या पक्षाची स्थिती आहे. गावागावात माझा पक्ष पोहोचला आहे. आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पक्ष विस्तारलेला आहे. याबद्दल मला तुम्हा कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. समाजात परिवर्तन करून बाबासाहेबांच्या विचारातला भारत उभा करायचा आहे. त्यामुळे मी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे. हा पक्ष केवळ दलितांचा ही ओळख बदलण्यासाठी आपण सर्वानी नेटाने प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.

रामदास आठवलेंची चारोळी :- मजबूत करण्या नेशन, होत आहे येथे अधिवेशन, दलित विरोधकांना घालण्या वेसण, करीत आहे मी पुण्यात भाषण, अशी चारोळी केली. 
तर एका कार्यकर्त्यांला भाषण करायला मिळाले, नाही म्हणून तो तावातावात गेला. त्यावर कोटी करत रामदास आठवले म्हणाले, आता अंदमानला पक्ष विस्तारासाठी जात आहे. असे गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी तिकडे पाठवेन. त्यावर उपस्थितांमधून हशा पिकला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget