(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ''करिअरच्या नव्या दिशा'' ज्ञानाचा खजिना - डॉ.पुरूषोत्तम भापकर | मराठी १ नंबर बातम्या

''करिअरच्या नव्या दिशा'' ज्ञानाचा खजिना - डॉ.पुरूषोत्तम भापकर

औरंगाबाद ( २६ जून २०१८ ) : ‘करिअरच्या नव्या दिशा’ (शासकीय अभ्यासक्रमांची ओळख) हे पुस्तक ज्ञानाचा खजिना आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य महत्त्वपूर्ण असते. या पुस्तकातून ते एकत्रित मिळाल्याने हा ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी खुला झाल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर आज म्हणाले.डॉ. भापकर यांच्याहस्ते समता दिनाचे औचित्य साधून ‘करिअरच्या नव्या दिशा’चे प्रकाशन झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. भापकर बोलत होते. यावेळी उपायुक्त वर्षा ठाकूर, महेंद्र हरपाळकर, सूर्यकांत हजारे, पारस बोथरा, साधना सावरकर, सरिता सूत्रावे, उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत-निंबाळकर, पुस्तकाचे लेखक तथा संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ, प्रकाशक विद्या बुक पब्लिशर्सचे शशीकांत पिंपळापुरे यांची उपस्थिती होती.

डॉ. भापकर म्हणाले, भारतीय संविधानाला समता प्रस्थापित होणे अभिप्रेत आहे. वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणल्यास समता प्रस्थापित होण्यास मदत होते. ज्ञान आणि कौशल्य शिक्षणातून बळ मिळते. हे बळ देण्याचे कार्य या ‘करिअरच्या नव्या दिशा’ यातून होणार आहे. ग्रामीण स्तरावरील, शहरी भागातील तरुणांना या पुस्तकाच्या वाचनातून प्रगत जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी यशाची गुरूकिल्ली यातून सापडणार आहे. स्वत:मधील क्षमता, आवड ओळखून शासनाच्या विविध रोजगाराभिमुख, कौशल्यावर आधारीत महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांची, संकेतस्थळांची माहिती होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

मराठवाडा विभागातून ‘स्कील इंडिया’ अंतर्गत एकच लक्ष दशलक्ष युवकांना रोजगाराभिमुख बनविण्याचा मानस आहे. या उपक्रमाला या पुस्तकाच्या माध्यमातून बळ मिळणार आहे. अत्यंत माहितीपूर्ण, संशोधनपूर्ण अशा या पुस्तक निर्मिती व लेखनाबद्दल भुजबळ, पिंपळापुरे यांचे कौतुक व अभिनंदन. राज्यातील तरुणांना ‘करिअरच्या नव्या दिशा’ दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही डॉ. भापकर यांनी व्यक्त केला.

सुरुवातीला भुजबळ यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विषद केली. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था, अभ्यासक्रम आहेत. मात्र, इंग्रजी ज्ञानाच्या अभावामुळे देशातील महत्त्वपूर्ण अशा रोजगाराभिमुख कोर्सेसची माहिती मराठी भाषक तरुणांना समजणे अवघड जाते. म्हणून शासनाच्या महान्यूज वेब पोर्टलवर ‘करिअरनामा’ सदरातून याबाबत लेखन केले. संबंधित लेखनास वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. तज्ज्ञांनी या सदरातील लेखन पुस्तक स्वरूपात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रकाशक पिंपळापुरे यांच्या माध्यमातून ती पूर्ण झाली. पारंपरिक शिक्षणापेक्षाही इतर कोर्सेस करून आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो, हे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न असल्याचेही भुजबळ म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget