(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहिम | मराठी १ नंबर बातम्या

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहिम

मुंबई ( २० जून २०१८ ) : राज्यात नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अनुसूचित जमात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विलंब होऊ नये म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत आठ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत असून शैक्षणिक कारणांसाठी दाखल होणाऱ्या अर्जांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.

या मोहिमे अंतर्गत अनुसूचित विद्यार्थ्यांना e-Tribe पोर्टलवर https://www.etribevalidty.mahaonline.gov.in ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सकाळी 9 ते 7 या कालावधीत 020-26360941 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या व त्यांचे कार्यक्षेत्र तसेच संपर्क दूरध्वनी खालीलप्रमाणे असल्याची माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या उपसंचालक यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
अ.क्र
समितीचे ठिकाण
पत्ता व दूरध्वनी क्रमांक
कार्यक्षेत्र
1
पुणे
28क्वीन्स गार्डनपुणे-1
020-26336961
पुणेसांगलीसातारासोलापूर व कोल्हापूर
2
ठाणे
वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयवर्तकनगर,ठाणे (पश्चिम)ठाणे.
022-25883503
ठाणेमुंबईमुंबई उपनगर,रायगडरत्नागिरी व सिंधुदूर्ग
3
नाशिक
आदिवासी विकास भवनजुना आग्रा रोड,नाशिक-422002
0253-2577059
नाशिक व अहमदनगर
4
औरंगाबाद
सेंट लॉरेन्स हायस्कूलजवळटाऊन सेंटर सिडको,औरंगाबाद
0240-2362901
औरंगाबादहिंगोलीपरभणी,जालनानांदेडबीडलातूर व उस्मानाबाद
5
अमरावती
शासकीय विश्रामगृहाजवळराज्य माहिती आयुक्त यांचे कार्यालयासमोरसना हाऊसजुना बायपास रोडचपराशीपुराअमरावती-444602
0721-2550995
अकोलाअमरावतीबुलढाणा,वाशिम आणि यवतमाळ
6
नागपूर
आदिवासी विकास भवनगिरी पेठनागपूर
0712-2560031
नागपूरवर्धाभंडारागोंदिया

7
नंदूरबार
शासकीय दूध डेअरीइमारतआरटीओजवळ,नंदूरबार
02564-210130
धुळेनंदूरबारजळगाव
8
गडचिरोली
जिल्हा परिषद कॉलनीकॉम्प्लेक्स,गडचिरोली-442605
07132-223179
गडचिरोली व चंद्रपूर

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget