(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); परिवहन मंत्र्यांच्या निदेशानंतर सेवा समाप्त केलेल्या एस.टी.च्या १ हजार १० रोजंदारी | मराठी १ नंबर बातम्या

परिवहन मंत्र्यांच्या निदेशानंतर सेवा समाप्त केलेल्या एस.टी.च्या १ हजार १० रोजंदारी

कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती

मुंबई ( २५ जून २०१८ ) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एस.टी.च्या स्थानिक प्रशासनाने ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता,

त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे निदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते त्याप्रमाणे अशा सर्व १ हजार १० कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती देण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्गमित केले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.

हे रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरी देखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एस.टी.चे आर्थिक नुकसान होताना प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय देखील झाली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती.

सेवा समाप्तीचा हा निर्णय मागे घेण्याबाबत प्राप्त झालेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहन मंत्र्यांनी निदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या आदेशाचे पालन करत अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचे निश्चित केले असून यासंदर्भातील परिपत्रक दि. २५ जून२०१८ रोजी निर्गमित केले आहे.

या परिपत्रकाप्रमाणे ज्या चालक तथा वाहक (कनिष्ठ), सहाय्यक लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) यांनी दि. ८ जून व दि. ९ जून २०१८ रोजी झालेल्या अघोषित संपात सहभाग घेतला आहे व ज्यांची सेवा विभाग/ घटक प्रमुख यांनी समाप्त केली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget