मुंबई ( २० जून २०१८ ) : नागपूर जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेच्या मंजूर विकास आराखड्यात क्रीडांगणासाठी राखीव असलेले आरक्षण क्र.24 वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
काटोल शहराच्या मंजूर विकास योजनेत नगर परिषदेच्या मालकीच्या सर्व्हे क्र.828 व 830 (जुना गट क्र.600) या जमिनीवरील आरक्षण क्र. 24 मधील 1.365 हेक्टर क्षेत्र क्रीडांगणासाठी आरक्षित होते. परंतु, त्या जमिनीवर नगरपरिषदेने यापूर्वीच एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत झोपडपट्टी पुनर्वसनासाठी घरकुले बांधली आहेत. त्यामुळे या जागेवरील क्रीडांगणाचे आरक्षण वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा