(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जगातील पहिले रेल्वे रुग्णालय | मराठी १ नंबर बातम्या

जगातील पहिले रेल्वे रुग्णालय

लातूर ( १३ जून २०१८ ) : जगातील पहिले चालते – फिरते रुग्णालय असलेली जीवन रेखा एक्सप्रेस (लाईफ लाईन एक्सप्रेस) ही रेल्वे लातूर रेल्वे स्थानकावर आलेली आहे. या रुग्णालयामार्फत दिनांक 16 जून 2018 ते 6 जुलै 2018 या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत जिल्ह्यातील गरजू रुग्णांवर मोफत आरोग्य सुविधा स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत, अशी माहिती इम्पॅक्ट फाऊंडेशन इंडियाचे उपसंचालक अनिल प्रेमसागर यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या मदतीने भारत पेट्रोलियम कंपनीच्या सौजन्याने आणि इम्पॅक्ट फाऊंडेशनद्वारे संचलित लाईफ लाईन एक्सप्रेस हे चालते - फिरते रुग्णालय लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांच्या प्रयत्नातून लातूर रेल्वे स्थानकावर आलेले असून येथील मोफत आरोग्य सुविधांचे उद्घाटन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते व खासदार सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 16 जून 2018 रोजी होणार असल्याचे प्रेमसागर यांनी सांगितले.

या रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून दिनांक 16 ते 19 जून 2018 या कालावधीत रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली जाऊन दिनांक 17 ते 22 जून 2018 या कालावधीत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच कानाचे विकार असलेल्या रुग्णांची तपासणी दिनांक 23 ते 26 जून 2018 रोजी करुन दिनांक 24 ते 29 जून या कालावधीत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्याप्रमाणेच तोंडाचे कॅन्सर रुग्णांची तपासणी व उपचार दिनांक 18 ते 30 जून 2018 या कालावधीत करुन दिनांक 5 जुलै ते 6 जुलै 2018 या कालावधीत रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती प्रेमसागर यांनी दिली.

स्त्री रोग उपचार (स्तन व गर्भाशय कॅन्सर तपासणी) दिनांक 18 ते 30 जून या कालावधीत करुन दिनाक 5 ते 6 जूलै रोजी त्या रुग्णावर शस्त्रक्रिया केल्या जातील. फाटलेले ओठ तसेच भाजलेल्या शरीरावरील तपासणी व उपचार दि. 30 जून ते 31 जुलै तर शस्त्रक्रिया 1 जूलै ते 3 जुलै या कालावधीत होतील. त्याचप्रमाणे पोलिओ रुग्णांचे प्रशिक्षण दि. 30 जून ते 1 जुलै कालावधीत केले जाऊन शस्त्रक्रिया 1 जूलै ते 3 जूलै या कालावधीत केल्या जाणार आहेत.

तसेच फिट मिर्गी तपासणी व उपचार दि. 18 ते 20 जून बी. पी. आणि शुगर तपासणी 18 ते 26 जून, दातांचे परिक्षण व उपचार दि. 22 ते 28 जून व कुटुंब नियोजन कार्यक्रम दि. 25 जून ते 1 जूलै 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे, असे प्रेमसागर यांनी सांगितले.

लाईफ लाईन एक्सप्रेस : केंद्रीय आरोग्य विभाग व इम्पॅक्ट फाऊंडेशन इंडिया यांच्या सहकार्याने रेल्वे विभागाने 16 जुलै 1991 रोजी लाईफ लाईन एक्सप्रेस या चालत्या – फिरत्या जगातील एकमेव रुग्णालयाची स्थापना केली. त्यानंतर या एक्सप्रेसने जवळपास 20 राज्यातील 193 जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात जाऊन त्या जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत. लातूर रेल्वे स्थानक हे 194 वे आहे.

आज सुमारे 27 वर्षात या रेल्वे रुग्णालयांने 10 लाखापेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करुन 1 लाख 20 हजार पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. डोळे, कान, तोंडाचा कॅन्सर, स्तन व गर्भाशय कॅन्सर, फाटलेले ओठ, पोलिओ, कुटुंब नियोजन आदि रुग्णाची तपासणी करुन औषधोपचार व शस्त्रक्रिया नि:शुल्क केली जाते, अशी माहिती प्रेससागर यांनी दिली. या रेल्वे रुग्णालयात 20 अधिकारी व कर्मचारी असून देशभरातून 50 ते 60 वरिष्ठ व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी बोलावून स्थानिक स्तरावर त्यांची आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जाते.

स्थानिक प्रशासनाचे सहकार्य : लाईफ लाईन एक्सप्रेस मार्फत उपलब्ध केल्या जाणाऱ्या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ गरजू रुग्णांना मिळण्यासाठी स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असते. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर व जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लाईफ लाईन एक्सप्रेससाठी रेल्वे स्थानकावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच आशा वर्कर्स व एन. एम. सेविका यांचे प्रशिक्षण पंचायत समिती गट स्तरावर घेण्यात येऊन त्यांना एक्सप्रेसमधील तज्ञांकडुन प्रशिक्षित करण्यात आलेले आहे, अशी माहिती प्रेससागर यांनी दिली.

लाईफ लाईन एक्सप्रेस मार्फत लातूर रेल्वे स्टेशन येथे दिनांक 16 जून ते 6 जुलै चा कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहेत. रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सोबत आधार कार्ड अथवा अन्य ओळखीचा पुरावा आणावा. तसेच भर्ती केलेल्या रुग्णाबरोबर एकाच माणसाला राहण्याची परवनगी आहे. तरी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व इम्पॅक्ट इंडियाचे उपसंचालक अनिल प्रेमसागर यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget