(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बुलढाण्यातील सेंट्रल बँकेतील प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल | मराठी १ नंबर बातम्या

बुलढाण्यातील सेंट्रल बँकेतील प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल

बुलढाणा ( २३ जून २०१८ ) : बुलढाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने पीककर्जासाठी एका महिलेशी केलेल्या अश्लाघ्य वर्तनाची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून स्वत: जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत.

ही घटना कानावर पडताच, जिल्हाधिकारी डॉ. डांगे यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क करून तत्काळ आरोपींच्या अटकेसाठी कारवाई करण्यास सांगितले. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली असून बँक व्यवस्थापक फरार असल्याने त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे. या बँक व्यवस्थापकाविरूद्धचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून तयार केला जात असून त्याच्या निलंबनासाठी सुद्धा बँक व्यवस्थापनाकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. असे प्रकार जिल्हा प्रशासन अजिबात खपवून घेणार नाही आणि त्याच्यावर कठोर कारवाई होईल, हे सुनिश्चित केले जाईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी स्पष्ट केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget