(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); तलाठ्यांच्या पारंपरिक हस्तलिखित सहीचा सातबारा शासकीय कामांसाठी ग्राह्य | मराठी १ नंबर बातम्या

तलाठ्यांच्या पारंपरिक हस्तलिखित सहीचा सातबारा शासकीय कामांसाठी ग्राह्य

मुंबई ( ४ जून २०१८ ) : ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा असलेला 7/12 उतारा हा डिजिटल स्वाक्षरीबरोबरच तलाठ्याने संगणकीकृत सात बारा उताऱ्यावर पारंपरिक पद्धतीने स्वाक्षरी करून देण्याची पद्धती सुरूच राहणार आहे. त्यामुळे तलाठ्यांच्या सहीचे सर्व संगणकीकृत सात बारा उतारा, फेरफार व गाव नमुना 8 अ (खातेउतारा) हे उतारे शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात बारा उतारा वितरीत करण्याची एक अतिरिक्त सुविधा दि 1 मे 2018 पासून उपलब्ध केली आहे. त्याचबरोबरच तलाठ्याने संगणकीकृत सात बारा पारंपरिक पद्धतीने स्वाक्षरी करून देण्याची पद्धती सुरूच आहे. आज अखेरपर्यंत 40 लाख सात बारा उतारे डिजीटल स्वाक्षरीयुक्त झाले असून ऊर्वरित उताऱ्यांचे काम काम टप्याटप्याने प्रगतीपथावर आहे. तसेच शासनाने यापुढे फक्त डिजीटल स्वाक्षरीचे सात बारा उतारे स्वीकारण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तलाठ्यायाने संगणकीकृत सातबारावर सही शिक्का करुन दिल्यास बोगस कागदपत्र दिल्याचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कोणताही तोंडी अथवा लेखी आदेश शासनाने दिलेले नाही. सद्य:स्थितीत सर्व संगणकीकृत सातबारा, फेरफार व गाव नमुना 8 अ (खातेउतारा) तलाठी यांच्या हस्तलिखीत स्वाक्षरीने वितरीत करण्याचे शासनाचे निर्देश आहेत व असे सातबारा उतारे सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

मागील आठवड्यात काही दिवस ई-फेरफार प्रकल्पाच्या मुख्य सर्व्हर (Monitor Server) मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यातील 29 जिल्ह्यामधील संगणकीकृत सात बारा बाबतचे कामकाज बाधित झाले होते. तथापि, त्यापैकी औरंगाबाद, नांदेड, नंदूरबार, परभणी व यवतमाळ हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांचे सर्व्हर दि. 1 जून 2018 रोजी सुरु करण्यात आले आहेत. वरील जिल्ह्यांचे सर्व्हर देखील दि. 3 जून 2018 रोजी सुरु केले आहेत. तथापि सर्व सर्व्हर पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची कार्यवाही माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून सुरु आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्तांनी दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget