(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 1 जून ते 31 जुलै दरम्यान सागरी मासेमारीवर बंदी | मराठी १ नंबर बातम्या

1 जून ते 31 जुलै दरम्यान सागरी मासेमारीवर बंदी

मुंबई ( ३१ मे २०१८ ) : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2018 या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात व भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रापर्यंत (इइझेड) मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे.

मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन, खराब तसेच वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्त हानी यांचे रक्षण करणे तसेच शाश्वत मच्छीमार व्यवस्थापनाच्या हेतूने 1 जूनच्या शासन निर्णयानुसार तसेच केंद्र शासनाच्या 22 फेब्रुवारी 2018 च्या आदेशानुसार ही मासेमारी बंदी घोषित करीत असल्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी जाहीर केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget