(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 4 ते 20 जुलै 2018 पर्यंत नागपूर अधिवेशन | मराठी १ नंबर बातम्या

4 ते 20 जुलै 2018 पर्यंत नागपूर अधिवेशन

मुंबई ( १९ जून २०१८ ) : नागपूर पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दि. 4 जुलै ते 20 जुलै 2018 असा विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आला. यावेळी शासकीय कामकाजाच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली.

या अधिवेशन कालावधीत शनिवार दि. 7 जुलै, आणि रविवार दि. 8 जुलै, तसेच शनिवार दि. 14 जुलै, आणि रविवार दि. 15 जुलै, 2018 या दिवशी अधिवेशनाला सुट्टी असणार आहे.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सर्वश्री अजित पवार, जयंत पाटील, गणपतराव देशमुख उपस्थित होते. विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, आमदार सर्वश्री सुनिल तटकरे, भाई गिरकर, जयंत पाटील आदी उपस्थित होते. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget