(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); 98 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन | मराठी १ नंबर बातम्या

98 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन

मुंबई ( १३ जून २०१८ ) : इतर शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये नाट्यनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते, म्हणूनच नाट्यनगरी म्हणून मुंबईची खरी ओळख असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने 98 वे अखिल भारतीय नाट्य संमेलन मुलुंड येथील कवी कालिदास नाट्यमंदीर आवारातील सुधा करमरकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या नाट्य संमेलनाचे उद्घाटन तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी तावडे बोलत होते.

या नाट्य संमेलनास खासदार शरद पवार, किरीट सोमय्या, आमदार सरदार तारासिंग, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, 98 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार, मावळते अध्यक्ष जयंत सावरकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे प्रसाद कांबळी, जेष्ठ नाट्यकर्मी सतीश आळेकर तसेच नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार, निर्माते आदी उपस्थित होते.

बऱ्याच वर्षानंतर मुंबई येथे मराठी नाट्य संमेलन होत आहे. या नाट्य संमेलनात विविध प्रकारची नाटके सादर होणार आहेत. या नाटकांमध्ये प्रबोधनात्मक नाटके असल्याने ती नक्कीच मुंबईकरांना आवडतील, असे
तावडे यावेळी म्हणाले.

नाटक हे राजाश्रीत नसावे तर ते राजपुरस्कृत असावे. असे सांगून ज्या क्षेत्रातील संमेलन असेल त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच स्वागताध्यक्ष करावे, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली. दरम्यान दुपारी 4 वाजता मुलुंड रेल्वे स्थानक येथून तावडे यांच्या उपस्थितीत नाट्य दिंडी काढण्यात आली. या नाट्य दिंडीत नाट्य कलावंत व रसिकांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget