(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’करिता अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’करिता अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई ( २१ जून २०१८ ) : मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील 12 पोटजातीतील सरासरी 60% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ करिता महामंडळाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्येष्ठता व गुणक्रमांकानुसार यासाठी निवड करण्यात येणार आहे. या पोटजातीमध्ये मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा यांचा समावेश आहे.

त्यासाठी इयत्ता 10 वी 12 वी, पदवी, पदव्यूत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, रेशनकार्ड,
शाळेचा दाखला, मार्कशीट, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतीत आपल्या पुर्ण पत्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई, गृहनिर्माणभवन, कलानगर, जळमजला, रुम नं. 33, बांद्रा (पू), मुंबई-400051 या पत्त्यावर दि. 10 जुलै 2018 पर्यंत अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय, मुंबई शहर-उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget