(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आंतरराष्ट्रीय योग दिन: राज्यपालांनी घेतला योग सत्रामध्ये भाग | मराठी १ नंबर बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिन: राज्यपालांनी घेतला योग सत्रामध्ये भाग

मुंबई ( २१ जून २०१८ ) : महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी जागतिक योग दिनानिमित्त राजभवन येथे एका विशेष योग सत्रामध्ये भाग घेतला आणि प्राणायाम व आसने केली.
कैवल्यधाम व योग संस्था सांताक्रुझ यांनी संयुक्तपणे या योगसत्राचे आयोजन केले होते. राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजीत कुमार तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी योगसत्रामध्ये सहभागी झाले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गेट-वे ऑफ इंडिया येथे योग दिन साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गेट-वे ऑफ इंडिया येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेट-वे ऑफ इंडिया येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई शहर तसेच पतंजली योग समिती व मुंबई ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, मुंबई येथील भारत स्वाभिमानी असोशिएशन अध्यक्ष सुरेश यादव, पंतजली समितीचे अध्यक्ष पोपटराव कदम, महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा मेधा चिपकर, सिआरपीएम, सीआयएसएफचे जवान, सिंडीकेट बँकेचे कर्मचारी, एमबीपीटीचे सदस्य, ओएनजीसीचे अधिकारी, होलीनेम हायस्कूल, सर जे जे हायस्कूल, बाईकाबीबाई हायस्कूल, सेंट ॲनीस हायस्कूल, जय हिंद कॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेस, सेंट जोसेफ हायस्कूल, सर जे जे गर्लस् हायस्कूल, एलफीस्टन कॉलेज, स्कॉलर हायस्कूलचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. स्वाभिमानी असोशिएशन अध्यक्ष सुरेश यादव यांनी विद्यार्थी व उपस्थितांना योगाची विविध प्रकाराचे प्रात्यक्षिके सादर करुन दाखविली.

मंत्रालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज मंत्रालयात मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी योगासने करुन सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र शासन आणि द योग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, विविध विभागाचे सहसचिव, उपसचिव यांच्यासह मंत्रालयीन विभागांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विविध योगासने केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget