(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भर पावसात विक्रमी वेळेत मेट्रो सिनेमाजवळील ६०० मिमी व्‍यासाची जलवाहिनी केली दुरुस्‍त | मराठी १ नंबर बातम्या

भर पावसात विक्रमी वेळेत मेट्रो सिनेमाजवळील ६०० मिमी व्‍यासाची जलवाहिनी केली दुरुस्‍त

मुंबई ( २६ जून २०१८ ) : मलबार टेकडी जलाशयातून आझाद मैदान जलाशयाला पाणीपुरवठा करणारी ६०० मिमी व्‍यासाची ४६ पौंड दाबाची जलवाहिनी मेट्रो सिनेमाजवळच्‍या आनंदीलाल पोदार मार्गावर काल (दिनांक २५ जून २०१८) सायंकाळी फुटून वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याने तातडीने २० फुट लांबीची व ६०० मिमी व्‍यासाची जलवाहिनी भर पावसात नव्‍याने टाकून दिनांक २६ जून २०१८ च्‍या पहाटे ४.३० वाजता विक्रमी वेळेत सदर काम पूर्ण केले. आज दूपारनंतर रस्‍तासुध्‍दा वाहतूकीस सुरु करण्‍यात आला आहे.

महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याने या संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठा खंडीत न करता तसेच पाणीपुरवठयाच्‍या वेळेत कुठलाही बदल न करता तसेच पाण्‍याचा कुठलाही अपव्‍यय न करता चोवीस तासांत २३१ मी.मी. पाऊस पडला असतानाही भर पावसात विक्रमी वेळेत हे काम रातोरात पूर्ण केले.
महापालिकेने तत्‍काळ जलवाहिन्‍याच्‍या दोन्‍ही बाजूने झडपा बंद केल्‍याने बदलापूर व अंबरनाथ सारख्‍या छोटया शहरांना होणाऱया पाणीपुरवठया इतका पाण्‍याचा अपव्‍यय टाळणे शक्‍य झाले. जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता (परिरक्षण) जलकामे शहर सुशि‍ल चव्‍हाण व दुय्यम अभियंता (परिरक्षण) जलकामे शहर शैलेंद्र सोनटक्‍के यांनी व जलअभियंता खात्‍यातील कर्मचाऱयांनी हे काम पूर्ण केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget