(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 15 जुलै रोजी मतदान | मराठी १ नंबर बातम्या

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 15 जुलै रोजी मतदान

मुंबई ( १५ जून २०१८ ) : भोर (जि. पुणे), वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला), वानाडोंगरी (नागपूर) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच विविध
11 नगरपरिषदा/ नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 15 जुलै 2018 रोजी मतदान; तर 16 जुलै 2018 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, भोर नगरपरिषदेची मुदत संपत आहे. त्याचबरोबर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा; तर मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायती आहेत. शेगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राकरितादेखील मतदान होत आहे. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींबरोबरच पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

पोटनिवडणूक होत असलेल्या जागांचा नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील: जव्हार (जि. पालघर)- 6ब, पोलादपूर (जि. रायगड)- 16, राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, पंढरपूर (जि. सोलापूर)- 10ब, वाई (जि. सातारा)- 5अ, मेढा (जि. सातारा)- 15, निफाड (जि. नाशिक)- 6, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- 12अ, नंदुरबार (जि. नंदुरबार)- 16अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- 2, मोहाडी (जि. भंडारा)- 12 आणि शेगाव (जि. बुलडाणा)- हद्दवाढ क्षेत्र.

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील

• नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 19 ते 25 जून 2018

• नामनिर्देशनपत्रांची छाननी- 26 जून 2018

• अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 02 जुलै 2018

• अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत

• मतदानाचा दिनांक- 15 जुलै 2018

• मतमोजणीचा दिनांक- 16 जुलै 2018
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget