मुंबई ( १४ जून २०१८ ) : शास्त्रीय संगीत कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत संस्था अनुदान योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते. सन 2018-2019 या आर्थिक वर्षाकरिताचे सहाय्यक अनुदान देण्यासाठी कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती या महसूल विभागातील पात्र संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विहित नमुन्यातील अर्ज आणि नियम www.maharashtra.gov.in आणि www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2018 आहे. संबंधित संस्थांनी त्यांचे पूर्ण भरलेले अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, महात्मा गांधी मार्ग, मुंबई- 400032 या पत्त्यावर पाठवावेत.

टिप्पणी पोस्ट करा